प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- काल बंगलोर येथील विवेक अशोक चलाणी (वय 36) याचा कोर्टाच्या आवारात चक्कर येऊन खाली पडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,विवेक याचा गेल्या काही वर्षांपासून येथील कोर्टात कौटुबिक वाद चालू आहे.आज कोर्टाची तारीख असल्याने नेहमी प्रमाणे कोर्टात आला असता तेथेच त्याला चक्कर आल्याने खाली कोसळला तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली असता शाहुपुरीचे पोलिस घटना स्थळी येऊन त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिसांत झाली आहे.