150 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 150 पत्रकारांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली .
नूर हॉस्पिटल बाईची पुरा येथे आज सकाळी दर्पण दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे उद्घाटन माझी विरोधी पक्षनेता डॉक्टर जफर अहमद खान यांच्या हस्ते करण्यात आले सोबत महानगरपालिका आरोग्य विभागाचे तन्वीर सिद्दिकी, समाजसेवक साजिद मौलाना, इब्राहिम पठाण, अफसर खान, मोहसीन अहमद, खान यासर मोहम्मद, शकीला पठाण, साहेब खान पठाण, अशरफ पठाण, माजी नगरसेवक जफर बिल्डर, शेख मुजीब अडूल, अलीम बेग दैनिक सकाळचे शेख लाल शेख, अनिल कुमार जमदाडे, माधव, अजमत पठाण,व्हॉईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंग जिल्हा अध्यक्ष अब्दुल कय्यूम,डॉक्टर शकील शेख, सलीम पटेल बोरगावकर, अजमत पठाण, संपादक तोफिक शाहबाज, दिशा सुरवसे पाटील, अश्रफ पठाण, शेख शफीक, सय्यद करीम, शकील अहमद शेख,हसन शहा आदींची उपस्थिती होती.
या उद्घाटनाप्रसंगी अब्दुल कय्युम यांनी सांगितलं की,वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसर 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो.
अर्थातच 1832 चा काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता आणि या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ या पाक्षिकाची सुरूवात मुंबई येथे करुन मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटविली. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू 'दर्पण' साठी सांभाळत. त्यामुळे 'दर्पण' तील मजकुराचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता.
यावेळी अनेक मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कय्युम यांचे कौतुक केले असून तसेच नूर हॉस्पिटलचे डॉक्टर शकील शेख यांचे पण अभिनंदन केले यावेळी 150 पत्रकार व त्यांचे परिवाराचे तपासणी करण्यात आलेली आहेत यावेळी नूर हॉस्पिटलचे डॉ गैसिया नाज, डॉ तनवीर सिद्दिकी, शरीफ शाह महानगरपालिका चे आरोग्य विभागातील आरोग्य केंद्र गांधीनगर डॉ तनवीर सिद्दिकी,श्रीमती रोहिणी तुंबारे,गीता खुरमुटे,भानुदास मुंढ विजय शर्मा संगीता जोशी प्रभावती आगे कल्पना हजारे आदींचे सहकार्य लाभलेले आहे.
शेखलाल शेख, अनिल कुमार जमधडे, माधव इतबारे, शेख फेरोज, डोंगरे,किशोर महाजन, परवेज खान,संजय हिंगोलिकर, रमेश जाबा, गणेश पवार, बबन सोनवने, शेख शफीक, अहमद अल हामेद, सय्यद मोईन,अलीम बेग,मोहंमद इसाकोद्दीन, एम ए शकील, शेख, इब्राहिम, शेख झाकीर, मनीष अग्रावल, सय्यद नदीम, सुरेश शिरसागर,सय्यद शब्बीर, रविंद्र शेलार, बाजीराव सोनवणे, सुजित ताजने, शेख रफीक, अकिब अहमद, आबासाहेब धुमाळ,इस्माईल खान, शेख सिराज, ईलयास शेख, इस्माईल हुसैन, सय्यद करीम, अनीस रामपुरे, शकील अहमद शेख, दिशा सुरवसे पाटील आदींनी उपस्थित होते