प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी :जनसामान्यांचा प्रहार न्यूजचा वर्धापन दिन दि. 04/02/2024 ला समाजवादी प्रबोधनी हॉल मध्ये उत्साहात संपन्न होणार आहे.जनहितासाठी सामाजिक कामगिरी बजावणारे शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, कला, क्रीडा सपमित्र, हस्तकला, उद्योजक, लेखक पत्रकारिता आणि इतर क्षेत्रातील उल्लेखनीय जनहितासाठी कामगिरी बजावत आहे.
या सर्वाच्या प्रमुख मान्यवरांच्या अतिथीं च्या हस्ते जनसामान्यांचा प्रहार न्यूज तर्फे राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे घोषित केले आहे. जनसामान्यांचा प्रहार न्यूज ने आतापर्यंत समाजामध्ये सर्व क्षेत्रातील बातमी व अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्याने जनसामान्याचा प्रहार न्यूज चे सर्वत्र कौतुक होत असते. याचे श्रेय जनसामान्यांचा प्रहार एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे सर्व प्रतिनिथीआणि श्री संपादक विकास गायकवाड यांना जाते. जनसामान्याचा प्रहार न्यूज चा प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम 04/02/2024 ला, शाहू पुतळा जवळ समाजवादी प्रबोधिनी हॉल इचलकरंजी येथे सुरेख पद्धुतीने आयोजन केले आहे.
सदर वर्धापन दिन सोहवळ्यास प्रमुख मान्यवर व दिग्गज पाहुणे हजर राहणार आहेत. दिनांक 28/01/2024 होणारा कार्यक्रम काही कारणास्तव पुढ़े ढकलण्यात आल्यामुळे संपादक विकास गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. व पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुढ़े ढकलण्यात आला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिनांक. 04/02/2024 संपन्न होणार आहे
यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय मांजरे तारदाळकर साहेब यांनी सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.