प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर:
पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त झालेली वाहने चक्क पोलिसांनीच विकुन टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे . या प्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याच्या गुन्हा दाखल केल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक करून आरोपीची कसून चौकशी केल्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे . या बाबत त्याने सांगितले की या पैकी काही गाड्या पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी परस्पर विकायला सांगितले असल्याचे त्याने सांगितले या प्रकरणा मध्ये पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली असून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.