संघटनेच्या कार्यालयाला आमदार विक्रमदादांची सदिच्छा भेट....
प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : येथील ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनच्या कार्यालयात संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या आयोजित बैठकीत संघटनेचे पत्रकार क्षेत्रातील आणि वंचित असलेल्या घटकाला प्रोत्साहित व प्रेरणा देणारे कार्य आहे तसेच इतर सामाजिक कार्यातील कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले. ते विजयनगर येथील ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्सच्या नामफलकाचे अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सागर बोराडे (सर) होते. प्रमुख उपस्थितांमध्ये जत पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब कोडग आणि रावसाहेब मंगसुळे हे उपस्थित होते. सुरुवातीस प्रा. डॉ. सागर बोराडे (सर) यांचे हस्ते आमदार विक्रमदादा सावंत यांचे पुष्पगुच्छ, शाल व संघटनेविषयी माहिती असलेली पुस्तके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच सभापती बाळासाहेब कोडग यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव दिपक ढवळे यांनी केले. सदर प्रास्ताविकात संस्थेच्या कामाकाजाची सर्व ती माहिती सादर केली. तसेच संस्थेचे महत्त्वपूर्ण कार्य आमदार यांच्यासमोर व्यक्त केले. तद्नंतर संस्थेचे सल्लागार मंडळाचे सदस्य शाहीन शेख यांनी संघटनेच्या व पत्रकार क्षेत्रातील समस्यांचा आढावा घेतला, त्यातील बारकावे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याप्रसंगी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अल्ताफ खतीब यांनीही संघटनेविषयी माहिती उपलब्ध करून दिली आणि संघटनेच्या कार्याचे महत्त्व विषद केले व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे संघटनेचे सदस्य आणि जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मारुती नवलाई यांनी वृत्तपत्र सदस्यांच्या समस्या मांडल्या आणि सहकार्याचे आश्वासन घेतले. आपली थोडक्यात पण उठावदार माहिती त्यांनी मांडली.
यावेळी आमदार विक्रमदादांनी सर्व इत्यंभूत माहिती जाणून घेऊन संघटनेच्या एकूण कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. त्यांनी जत तालुक्यातील दुष्काळ, पावसाची अवकृपा व नेत्यांचे दुर्लक्ष आदी प्रश्नांचा उहापोह करून प्रलंबित प्रश्नांसंबंधी वृत्तपत्रांनी व आणि त्यांच्या संपादकांनी या प्रश्नावर लक्ष वेधून, या प्रश्नांबाबत आवाज उठविण्याचे आवाहन केले. ऑल रजिस्टर न्यूजपेपर्सच्या संस्थेला येणार्या अडचणीविषयी तसेच ते करीत असलेल्या मोलाच्या कार्यासाठी त्यांनी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
तद्नंतर ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्सच्या सर्व पदाधिकार्यांसहीत सर्व सदस्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सागर बोराडे (सर) यांनी आपल्या अध्यक्षय मनोगतात संस्थेच्या कामकाजाविषयी तसेच पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना पत्रकारांच्या समस्या त्यांनी मांडल्या. संघटनेतील पत्रकार हे प्रामाणिक, सचोटीचे असून त्यांचे नियमितपणे प्रकाशित होणारे न्यूजपेपर्स आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांनी आपल्या अनुभवासह डॉ. पतंगराव कदमसाहेब यांच्यासोबत आलेल्या प्रसंग व केलेले कामाची माहिती उपस्थितांना सादर केली. डॉ. पतंगराव कदम हे नुसते राजकीय व्यक्तीच नव्हते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे रूपच होते असेही डॉ. बोराडे सर म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे आभार संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पोतदार यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डॉ. सागर बोराडे (सर), सांगली जिल्हा अध्यक्ष अल्ताफ खतीब, राज्याचे सचिव दिपक ढवळे, कायदेशीर सल्लागार ऍड. बाळासो वाघमोडे, विजयकुमार पोतदार, धोंडीराम शिंदे, दत्तराज हिप्परकर, जे. वाय. पाटील, श्री. अमर चोपडे, शाहीर खराडे, राहुल मोरे, शाहिन शेख, यश ढवळे, शशिकांत कुंभोजकर, सूर्यकांत कुकडे, मारुती नवलाई, गणेश पाटील, विकास कोल्हटकर, पिंटी कागवाडकर, विकास कुलकर्णी, नाना हुलवान, नजीर झारी, शंकर माने तसेच संघटनेतील सर्व पदाधिकारी, सर्व संपादक, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्री. दत्तराज हिप्परकर, अल्ताफ खतीब, यश ढवळे, दिपक ढवळे, गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.