आदिवासी प्रकल्प विभागावर दलित महासंघाचा विराट 'उघडा मोर्चा



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे :  आदिवासी पारधी समाजासाठी ' असणाऱ्या योजनांची ठोस व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या व अन्य मागण्यासाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली घोडेगांव ता.आंबेगाव जि. पुणे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर आदिवासीच्या पारंपारिक वेशभूषेत विराट 'उघडा मोर्चा' काढण्यात आला

मोर्चामध्ये दलित महासंघांचे प.महा उपाध्यक्ष उमेश चव्हाण,राज्य संपर्कप्रमुख उत्तमदादा मोहिते,आदिवासी पारधी हक्क अभियानाचे मार्गदर्शक बसवराज चव्हाण,प.महा नेते सुनिल मोरे सर,प.महा नेते सदाभाऊ चांदणे,प.महा सरचिटणीस शामराव क्षीरसागर,प.महा कोषाध्यक्ष दिनकर नांगरे,कोल्हापूर जि.नेते संदीप गायकवाड,सांगली जि.नेते संभाजी मस्के,वाळवा ता.अध्यक्ष नारायण वायदंडे,आष्टा शहर अध्यक्ष छोटू घस्ते,ता.कार्याध्यक्ष राजू वायदंडे,पलूस युवक अध्यक्ष गणेश वारे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे प.महा कार्याध्यक्ष जितेंद्र काळे,प.महा उपाध्यक्ष टारझन पवार,प.महा संपर्क प्रमुख इंद्रजित काळे,महिला आघाडी प.महा अध्यक्षा निर्मला पवार,प. महा संघटक नागेश पवार,सातारा जि. संपर्क प्रमुख नम्या भोसले,तासगांव ता.अध्यक्ष अशोक पवार, जतचे शिवाजी शिवाजी चव्हाण, नामदेव चव्हाण,म.आ गुंडाबाई काळे,महिला आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष रोशना पवार,सातारा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या भोसले, वाळवा ता.अध्यक्ष मालन पवार,सांगली जि.उपाध्यक्ष उषा चव्हाण,नमिना पवार,जि. संघटक जयश्री चव्हाण यांच्यासह सांगली,कोल्हापूर,सातारा, पुणे,सोलापूर जिल्ह्यातून हजारो पारधी बांधव सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post