प्राचार्या सौ श्वेता सचिन चौगुले याना नेपाळ देशातील डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  : प्राचार्या सौ श्वेता सचिन चौगुले  याना नेपाळ देशातील डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित  करण्यात आले  , सिध्दरेखा फाऊंडेशन भारत अध्यक्ष.इंचलकरंजी जि.कोल्हापुर नेपाळ देशातील डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली

14जानेवारी 2024रोजी नाशिक येथे गांधी पिस फाऊंडेशन नेपाळ व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र 4था गांधी पिस डॉक्टरेट पदवी बहाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला . प्रमुख पाहुणे/अतिथी मान्यवर डॉ. बी जी शेखर पाटील नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक मंहत भक्तीचरण दास पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट पंचवटी नाशिक डॉ. लाल बहादूर राणा संस्थापक अध्यक्षगांधी पिस फाऊंडेशन नेपाळ ड . नितीन ठाकरे मराठा विद्या प्रसारक सरचिटणीस व नाशिक जिल्हा बार कॅन्सल अध्यक्ष श्री बी एस वाघ माजी जिल्हाधिकारी प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे (अध्यक्ष, पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संचालक:- आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी,नाशिक गेस्ट ऑफ वोनर श्री डॉ. संघपाल उमरे ,संस्थापक अध्यक्ष पोलिस मित्र परिवार समन्वय समिती आदी उपस्थित होते यांच्या मार्फत प्राचार्या सौ श्वेता सचिन चौगुले- निर्मळे सिध्दरेखा फाऊंडेशन भारत अध्यक्ष इंचलकरंजी जि.कोल्हापुर डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली यामध्ये मेडल सर्टिफिकेट व टाॅफी देऊन गौरविण्यात आले.

 सौ श्वेता सचिन चौगुले यांचे  शैक्षणिक व सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे आणि त्यामुळेच त्यांना नेपाळ येथील डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. सौ श्वेता सचिन चौगुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा खालील प्रमाणे आहे.नाव  : डॉ सौ. आर.एल. निर्मळे - चौगुले.

 लग्ना पूर्वीचे नाव : रेखा लक्ष्मण निर्मळे  .

 लग्नानंतरचे नाव. : श्वेता सचिन चौगुले.

 एकूण अनुभव:  17 वर्षे 

प्रशासन अनुभव: 8 वर्ष सध्या :अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे  प्रिन्सिपल म्हणून कार्यरत

 शैक्षणिक पात्रता:  बीए बीएड, एम ए ,एम एड ,एमबीए ,सेट( शिक्षण शास्त्र आणि मराठी ), journalism, पी .एच.डी (Appearing)बीए बीएड शिवाजी विद्यापीठ तृतीय ,एम ए विद्यापीठात प्रथम ,एम एड प्रथम .2012 मध्ये यशदा मध्ये सिलेक्शन

2006 ते 2011 बसवराज होरटी डीएड व बीएड कॉलेज बेडकीहाळ कर्नाटक येथे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्यरत. 

2011 ते 2017 अशोकराव माने बीएड कॉलेज पेठ वडगाव येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत 

2017 ते आज पर्यंत अशोकराव माने बीएड कॉलेज पेठ वडगाव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत.

 पुरस्कार : 

अखिल भारतीय चर्मकार समाजाचा जीवनगौरव पुरस्कार, नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवार्ड . युवा शक्ती पत्रकार संघ औरंगाबाद यांच्याकडून कोविड योद्धा पुरस्कार सन्मान ,डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एक्सलन्स अवॉर्ड, सकाळ तनिष्का पुरस्कार, दिशा पर्यावरण  पुरस्कार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय मिरज जिल्हा वनविभाग  सांगली यांच्यामार्फत पुरस्कार. जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व सरपंच सेवा संघ अहमदनगर यांच्यामार्फत राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार, आपले मानवाधिकार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आपले मानवाधिकार भूषण पुरस्कार, महावीर महाविद्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत  कौतुकास्पद माजी विद्यार्थी पुरस्कार सलग दोन वर्ष पुरस्कार,इंटरनॅशनल लीडरशिप एक्सेलन्स अवॉर्ड , निसर्ग राजा ग्रुप मानकापूर कर्नाटक यांच्यामार्फत राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार 2023.

सावित्रीच्या लेकी पुरस्कार 2023 , फुले , शाहू,आंबेडकर विचारमंच टाकवडे. आदर्श प्राचार्य पुरस्कार.. ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम कोविड योद्धा पुरस्कार , ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड व सक्षम सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कृतज्ञता दिनानिमित्त सन्मानपत्र महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्याकडून कोविड योद्धा पुरस्कार, महावीर इंटरनॅशनल कडून नवदुर्गा पुरस्कार.

 पदावर कार्यरत : 

ह्यूमन  राइट्स असोसिएशन कोल्हापूर जिल्हा सचिव , पोलीस मित्र परिवार  कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य , दिशा पर्यावरण व प्राणी संवर्धन पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक 

, राष्ट्रीय युवाशक्ती महाराष्ट्र संघटन मंत्री,ग्राहक पंचायत महाराष्ट्र , डिजिटल प्रेस मीडिया महाराष्ट्र  उपसंपादक, वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर समन्वयक

 शैक्षणिक कार्य : 

नॅशनल, इंटरनॅशनल पेपर प्रेझेंटेशन आणि पब्लिकेशन्स, पाचशेहून अधिक सेमिनार वर्कशॉप मध्ये सहभाग, महिला सबलीकरण मध्ये योगदान , विविध विषयावर दोनशेहून अधिक व्याख्याने, स्पर्धा परीक्षा ,टीईटी सेट-नेट साठी मार्गदर्शन.

 पेटंट :तीन

 लेखन : रिसर्च मेथोडोलॉजी पुस्तक प्रकाशित, विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन, विविध चिंतनपर शैक्षणिक सामाजिक लेख प्रसिद्ध.

सिद्धरेखा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष ,सामाजिक क्षेत्रात अग्रेसर, घरेलू कामगार, सफाई कामगार व वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्य... अशाप्रकारे त्यांचे बहुमोल असे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान आहे आणि त्यामुळेच याची दखल घेऊन त्यांना नेपाळ पीस फाउंडेशन कडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post