संगीत ही पाहण्याची नसून, ऐकण्याची गोष्ट – कीरवानी



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे, दि, १९ जानेवारी २०२४ : लोक संगीत डोळ्याने पाहतात त्यामुळे, संगीतकार चित्रपट कलाकारांसारखे प्रसिद्ध नसतात, संगीत ही पाहण्याची नसून, ऐकण्याची गोष्ट आहे, असे मत संगीत दिग्दर्शक एम. एम. किरवानी यांनी व्यक्त केले.  

पुणे येथे सुरू असलेल्या २२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक किरवानी यांची मुलाखत घेतली. 

किरवानी म्हणाले, की चित्रपटातील कोणतेही गाणे हे गीतकार, गायक आणि संगीतकार अशा सगळ्यांच्या एकत्रीत प्रयातनातून तयार होते. मात्र ते पडद्यावर नायकाच्या स्वरूपात दिसते आणि लोक गाणे पडद्यावर बघतात आणि त्यांच्या नावाने गाणे लक्षात ठेवतात. जेंव्हा लोक संगीतकाराच्या संदर्भात गाणे लक्षात ठेवतील, तेंव्हा संगीतकार प्रसिद्ध होतील्. 

आपल्या संगीतीक प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, की त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीताची ओळख करून दिली. त्यांनी व्हायोलीन वाजवण्यापासून संगीत शिकायला सुरुवात केली. मात्र नंतर त्यांनी वडिलांच्या सूचनेनुसार संगीताची धुन तयार करायला सुरुवात केली आणि नंतर ते हार्मोनियम आणि पियानो वाजवू लागले. राघवेंद्र स्वामी यांच्यावरील गाणे त्यांनी प्रथम तयार केले आणि त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला. 

पार्श्वसंगीत देणारा संगीतकार आणि गाणे तयार करणारे संगीतकार यांच्यामध्ये काय दर्जाचा फरक आहे, असे विचारता कीरवानी म्हणाले, किचनमध्ये काम करताना कोणी स्वयंपाक करतो, कोणी भांडी धुण्याचे काम करतो. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असा काही फरक नाही. ज्याला जे काम जमते ते तो काम करतो. 

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याविषयीच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.

Post a Comment

Previous Post Next Post