ख्रिस्ती जागेच्या दफनभुमीसाठी आमरण उपोषण कर्त्याचे आमरण उपोषण स्थगित.



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापुर- ख्रिस्ती बांधवानी दफनभूमीच्या जागेसाठी गेल्या तीन चार दिवसापासून कोल्हापुर  महानगरपालिका परिसरात आमरण उपोषणास बसले होते.त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन महिन्याभरात जागा उपलब्ध करुन देण्याचे लेखी स्वरुपात दिल्यामुळे राकेश सावंत ,संतोष बनगे ,बाबासो पाटोळे,जोशवा सावंत आणि अजय पाटोळे यांनी हे आमरण उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले.या प्रकरणी अतिरीक्त आयुक्त रविकांत अडसुळ यांनी बैठक घेतली.

या वेळी ख्रिस्ती समाजातील कार्यकर्त्यासह विविध क्षेत्रातील राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post