प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे, दि. २१ (प्रतिनिधी) - उद्या अयोध्येत प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे देशभर आनंद साजरा होत आहे. यामध्ये भाजपने राम मंदिराच्या श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तीस वर्षांपूर्वी कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. ते खरे सुपर हिरो आहेत. आजच्या आनंदाच्या दिवसाचे सर्व श्रेय या कारसेवकांना आहे.
यामुळे याचे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी कारसेवकांच्या योगदानाकडे लक्ष द्यावी, असे प्रतिपादन शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मस्थळी तयार केलेल्या स्मारकाचे पूजन व अयोध्या येथे गेलेल्या कारसेवकांचा सत्कार समारंभानिमित्त सदाशिव पेठेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक, अविनाश बलकवडे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारीख, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, कसबा समन्वयक प्रसाद चावरे, रुपेश पवार, गौरव सिन्नरकर, प्रसाद गिजरे, नंदकुमार येवले, राजेश मोरे, अजय परदेशी, युवराज परीख, उपस्थित होते .
यावेळी जेष्ठ शिवसैनिक दिलीप पोमान, सोमनाथ तेलंगी, मकरंद पेठकर, बाळासाहेब गरुड, अतुल गोंदकर, अर्जुन जनगवली, दिलीप गालिंदे, विजय ठाकर, निर्मला केंडे, राधिका हरिश्चंद्रे, श्रीमती साधना दिलीप जगताप, बाळासाहेब अष्टेकर, ज्ञानेश्वर घोणे, राजेंद्र शिळीमकर, संजय हिरणावळे, गौरव ससाट, दत्तात्रय सहाणे, राजाराम तुपे, आनंदा ओव्हाळ, अशोक उबाळे, श्रीकांत पतंगे, रमेश वर्मा, अशोक गुप्ते, राजेश हिरले , महेश सौदाने, या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ शिवसैनिकांच्या व कारसेवकांच्यावतीने दिलीप गालिंदे यांनी बाबरी विध्वंसाच्या आठवणी ताज्या केल्या.
या कार्यक्रमाचे नंदू येवल, नितीन रावळेकर, मोहन देशपांडे, राजेश मांढरे, अरविंद दाभोलकर, आशुतोष मोकाशी, निखिल जाधव, तुषार जाधव, सदाशिव पेठ शिवसेना शाखा व हिंदुहृदयसम्राट फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी आयोजन केले होते. सूत्रसंचालन अनंत घरत आणि आभार विभागप्रमुख राजेश मोरे मानले .