ऑल राजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशन वतीने पत्रकार दिना निमित्त समाजातील दुर्लक्षीत व्यक्तीचा सन्मान


प्रेस मीडिया लाईव्ह :

मिरज :  आज  सहा जानेवारी बाळ शास्त्री जांभेकर यांचा स्मुर्ती दीन व पत्रकार दीन ऑल राजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशन वतीने साजरा करण्यात आला .संपादक प्रगत हिंदुस्थान दीपक ढवळे यांनी या पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुुरवात करण्यात आली.




 मिरज येथील बायसिंगर लायब्ररी येथे ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनने आयोजित प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकारी सौ.संप्रदा बिडकर सांगलीचे  प्रसिद्ध सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य कार्यकारीणीचे अध्यक्ष प्रा.डॉ. सागर उपस्थित होते 

  मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली 

  यावेळी प्रमुख पाहुने सरकारी वकील बासाहेब देशपांडे यांनी पूर्वीची व आताची पत्रकारिता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी पत्रकारांविषयी शासन राबवित असलेल्या योजनांची सविस्तर माहीती दिली.   संघटनेचे राज्यसचिव दिपक ढवळे यांनी संघटनेच्या कामकाजा आढावा दिला तसेच पुरस्करित मान्यवरांच्या कतृत्वा विषयी सविस्तर माहीती सादर केली.

  सदर कार्यकमास पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा, संघटनेच्या राज्य कार्यकारीणी सदस्यांचा तसेच जिल्हा कार्यकारीणी व तालुका अध्यक्षांचा सन्मान शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे -

  जीवन गौरव पुरस्कार : डॉ. अनिल कृष्णा दबडे, डॉ. परसराम आ. बन्ने, आदर्श उद्योजक पुरस्कारः नामदेव मारुती भिर्डे, धन्वंतरी पुरस्कार : डॉ. सचिन बापूसो पवार, नारायण शंकर डवर, विधिज्ञ पुरस्कार : कोणार्क ज्ञानचंद्र पाटील, बिल्डर पुरस्कार : उत्तम श्रीपती वाघवेकर अभियंता : महेश आप्पासाहेब पाटील, फोटो ग्राफर पुरस्कार : सचिन विष्णू सुतार, सागर सदाशिव घाडगे, वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार : मारुती भिमराव नवलाई  , राम भुपाल कुंभार ऑपरेटर पुरस्कार :  शांता कुमारी समडेपोगोलू, निवेदक पुरस्कार : विजयकुमार बाळकृष्ण कडणे (दादा), क्रिएटिव्ह संपादक पुरस्कार : दत्तराज भिमराव खंडागळे, वार्ताहर पुरस्कार : सुर्यकांत सिध्देश्वर कुकडे, विशेष गौरव पुरस्कार : निलकंठ बळवंत देqशगकर, आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडीया       पुरस्कार : असिफ मुबारक मुरसल  , आदर्श qप्रट मिडीया पुरस्कार :गणेश बंडोपंथ पाटील, जगन्नाथ यशवंत पाटील, सामाजिक कार्य पुरस्कार : सुरेश शामराव हराळे, साहित्यीक पुरस्कार : अभिजीत पाटील इत्यादी पुरस्कार देण्यात आले.

  प्रा. डॉ. सागर बोरोडे यांनी अध्यक्षीय भाषणात वृतपत्र चालवित असताना येणाèया अडचणी विषयी सविस्तर चर्चा केली. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ खतीब यांनी उपस्थितांचे मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

या प्रसंगी वृत्त पत्र,संपादक, पत्रकार वार्ताहर, प्रतिनिधी, छायाचित्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकार बांधव, हितचिंतक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post