मनोज जरांगेंच्या या गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळालं आहे. मराठा आरक्षणासाठीच्या असलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा झाली.

जिथं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यांनी यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्युस आणि पेढा भरवून त्यांचं उपोषण सोडवलं. संपूर्ण आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या एका गोष्टीमुळे मुख्यमंत्री इम्प्रेस झाले आहेत. त्यांनी सभेत सर्वांसमोर त्यांचं कौतुक केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, "आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केलं, त्या मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो. सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं. मनोज जरांगे यांच्या शिस्तीचा बडगा पाहायला मिळाला. कुठंही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केलं, आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी घेतली, शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं, यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो"तब्बल 7 दिवसांचा लढा, कडाक्याच्या थंडीत 382 किमी प्रवास, जरांगेंनी काय मिळवलं?

या मराठा समाजाचा संघर्ष आहे अनेक लोकांना मोठं केलं नेते केलं पदं मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना संधी आली तेव्हा संधी द्यायला हवी होती. आजचा दिवस तुमचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस गुलाला उधळण्याचा दिवस आहे,

मी आपल्या प्रेमापोटी आज या ठिकाणी आलो, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या, सरकारची मनसिकता आणि इच्छाशक्ती देण्याची आहे. हे देणारं सरकार आहे घेणारं नाही. आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार मनोजदादा हे सर्वसामान्यांचं, माताभगिनींचं, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत घेतले आहेत. दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा मनोजदादाच्या मागे तुम्ही उभे राहिलात, अशा प्रकारच्या आंदोलनाचं नेतृत्व जेव्हा सर्वसामान्य माणूस करतो तेव्हा त्या आंदोलनाचं वेगळेपण असतं. म्हणूनच आज मुख्यमंत्रीदेखील सामान्य माणूसच आहे, असं ते म्हणाले.लेकरांनी खूप संघर्ष केला, कधी रस्त्यावर झोपले तर कधी...; जरांगे पाटील झाले भावुक

कोणत्या मागण्या मान्य..?

ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्यावं तसंच त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावं, हे सरकारने मान्य केलं. आतापर्यंत 57 लाख नोदी सापडल्या.सरकारने सग्यासोयराबद्दल अध्यादेश काढला आहे. तो मनोज जरांगेंना देण्यात आला.त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबीप्रमाणपत्र असेल त्यांच्या नातेवाईकांनाही कुणबी म्हणूनच मान्यता मिळाली.

जालना आणि बीडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अनेक मराठा बांधवांवर गुन्हे दाखल होते. त्या मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे.वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडले आहे. त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे.

जो अध्यादेश दिला आहे, त्याबद्दल विधानसभेत लवकरच कायदा करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post