विशेष वृत्त : कारवाई करणारे कोमात गुंडगिरी जोमात.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-शहरात गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी डोके वर काढत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.काही भागात फुकटची मिठाई न दिल्याने मारहाणीत झालेला व्यावसायिकां मृत्यु.दोन गटात वर्चस्ववादातुन झालेला चाकू हल्ला, ज्या - ज्या भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन रेकॉर्ड वरील गुन्हेगाराची धरपकड करून खंडणी मागणी करणाऱ्या विरोधात नागरिकांना तक्रार करण्याचे आव्हान,त्याच्या दुसऱ्या दिवशी सदरबाजार येथे मस्जिद संचालक वर्चस्वातुन झालेला तलवार हल्ला आणि दोनवडे फाटा येथे घेतलेले पैसे परत मागितल्याने दोघां संशयीतानी लॉज चालकावर केलेल्या गोळीबारात एकाने मृत्यु गमावल्याच्या अशा अनेक घटना शहरात घडत असल्याने कोल्हापूरचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही असे नागरिकांतुन बोलले जात आहे.

सध्या कारवाई करणारे करतात तरी काय असा प्रश्न पडला आहे. काही जणांतुन कारवाईचा धाक राहिला नसल्याचे म्हणत आहेत. शहरात आताप्रर्यत एखादं दुसरी केलेली कारवाई सोडली तर गुंडाच्यावर यांचा धाकच उरलेला नाही.जर एखादा नागरिक गुंडाच्या विरोधात किंवा अवैद्य व्यवसाय करण्यारया कडुन नागरिकांना होणारा त्रास याच्या विरोधात तक्रार द्यायला गेले तर संबंधीता कडुन काही तरी कारण सांगून परत पाठविले जाते आणि मग गुंडाच्या कडुन जबर मारहाण झाली की मग कारवाई साठी पुढ़े सरसावतात.

असाच प्रकार टिंबर मार्केट परिसरात घडल्याची माहिती पुढ़े आली त्या परिसरात दोन नंबरचा व्यवसाय चालू असून त्यांच्या कडुन शेजारी रहात असलेल्या महिलेला रोज भांडणे करून त्रास देऊ लागले जेणे करुन ती महिला खोली सोडून जाईल .या रोजच्या त्रासाला कंटाळून हद्दीतल्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेली असता प्रथम त्या महिलेस काहीतरी कारण सांगून परत पाठविल्याचे समजते.परत त्या महिले सोबत भाडू लागल्याचे समजताच कामावर गेलेला तिचा मुलगा आला असता त्या मुलाला दोघा -तिघांनी जबर मारहाण केली.असता हद्दीतल्या पोलिस ठाण्यात जाऊन मारहाण केलेची तक्रार केली असता कुठे मारले असं विचारताच त्याच्या पुढ़े कपडे काढून दाखविले असता मग त्यांची धावपळ उडाल्याची समजते जर त्या महिलेची अगोदरच तक्रारीची दखल घेतली असती तर त्या महिलेच्या मुलाला मारहाण झाली नसती असं त्या परिसरात नागरिकांच्यातुन बोलले जात आहे.

अशा प्रकारच्या घटनाना पायबंद घालायचा असेल तर संबंधचा वचक राहिला पाहिजे जेणे करुन त्रास देणारी व्यक्ती दहादा विचार करेल अशा गुंडाना कारवाई करणारयांचा धाक राहिला पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post