विशेष वृत्त : भुमि अभिलेख कार्यालयात रात्रीस खेळ चाले.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- भुमि अभिलेख कार्यालयात नागरिकांचे मुख्य काम म्हणजे वारस नोंदी करणे किंवा वारसाची नावे कमी करणे .त्या साठी या विभागाकडे रितसर अर्ज केला जातो.त्या साठी लागणारी कागदपत्रं म्हणजे तीन महिन्यातील प्रॉपर्टी कार्ड हे काढ़ताना कमीत कमी फी भरून घेऊन आठ दिवसात मिळणार असे सांगितले जाते.

जर लगेच पाहिजे तर तेथे वेगळी यंत्रणा कार्यरत रहाते.तेथील काही जण रिटायर्ड होऊन सुध्दा गरजूना आपला हात ओला करून बेधक कार्यालयात जाऊन पाहिजे असलेले कागदपत्रं एका दिवसात  त्या परिसरात असलेल्या एका सेंटर वर सायंकाळी सातच्या सुमारास कॉपी काढ़ून दिल्या जातात.काही जण यात माहिर आहेत.जर एखाद्याला ॲपीडेवीट करायचे असेल तर त्या साठी एका दिवसात देण्यासाठी वेगळी यंत्रणा राबत असते त्या अर्जावर सामान्य माणूस गेला की त्यावर सही शिक्का घेण्यासाठी गेला तर परत पाठविले जाते पण त्यांचा माणूस गेला की लगेच काम होते.

कारण त्या अर्जावर संबंधित व्यक्तीचा ट्रेडमार्क असतो.ही लागणारी कागदपत्रे काढ़ण्यासाठी संबंधिताना लाच दिल्या शिवाय कामेच होत नाहीत.असाच प्रकार जिल्हा भुमिअभिलेख कार्यालयातला क्लास वन ऑफिसर आणि त्यांचा वाहन चालक लाच घेताना सापडले.पण यांनी या अगोदर अशा प्रकारे किती लोकांची लाच घेऊन वारस नोंदीचे कामे केलीत याची चौकशी होणे गरजेचे आहे.याच कार्यालयात शहरातील एका मिळकतीला एका व्यक्तीने या कार्यालयाकडे वारस नोंदी साठी अर्ज केला होता.त्या व्यक्तीने त्या काळातील कोणतीही कागदपत्रे नसताना एका वर्षात लागणारी कागदपत्रे तयार करून या कार्यालयातील संबंधिताना हाताशी धरून मोठा आर्थिक व्यवहार करून वारस नोंद केल्याची शक्यता नाकारता येत नाही.हे ही प्रकरण आता लाच प्रकरणी सापडलेलया यांच्या काळात घडले आहे.

ज्या व्यक्तीने वारसाची नावे कमी करणे व वारस नोंद करून घेतली आहे  त्या व्यक्तीने नगरभूपान विभागाकडे वारस नोंदी साठी अर्ज केला होता.पण त्या व्यक्तीकडे योग्य कागदपत्रं नसल्याने तेथील अधिकारी यांनी तक्रादाराच्या बाजूने निकाल दिला होता.त्या नंतर त्या व्यक्तीने जिल्हा भुमिअभिलेख कार्यालयात अर्ज करून आपल्या बाजूने आर्थिक व्यवहार करून वारस नोंद केल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्या कार्यालयात अशा प्रकारचे सावज हेरण्याची एक यंत्रणा राबत असण्याची शक्यता आहे.त्या शिवाय अशा क्लास वन ऑफिसर सारख्यांचे लाच घेण्याचे धाडस होणार नाही.अशा लोकांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.तरच पुढ़च्यास ठेच मागचा शहाणा होऊन कुठे तरी आळा बसेल.

Post a Comment

Previous Post Next Post