प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ /प्रतिनिधी:
पत्रकार व समाज यांचे एक चांगले नाते असते. लोकांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करीत असतात. आपसामध्ये द्वेष, मत्सर न करता चांगल्याचे कौतुक करण्याची भावना त्यांची असते. शिरोळ तालुक्यामध्ये अनेक उणिवा असून त्या दूर करण्यासाठी पत्रकारांनी त्या उणिवांना, समस्यांना वाचा फोडावी, सुप्त गुणांना वाव द्यावे अशी आपली अपेक्षा आहे. विचारांची दिशा घेऊन काम करण्यासाठी सर्व पत्रकारांसाठी फेब्रुवारीमध्ये एक दिवसीय कार्यशाळा, शिबिर घेणार आहे, अशी माहिती श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
दत्त कारखाना कार्यस्थळावर पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. किरण पाटील कणंगलेकर यांच्या मित्रपरिवार व कुटुंबीयांच्या वतीने पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी रंगकर्मी राजेंद्र प्रधान यांनी पत्रकारांच्या सत्कारामागील उद्देश स्पष्ट केला. ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार व डॉ. दगडू माने यांनी पत्रकार हे केवळ बातमी पुरता मर्यादित न राहता लोकांच्या मूलभूत गरजांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून काम करीत असल्याचे सांगितले. सर्वच वक्त्यांनी किरण पाटील कणंगलेकर व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानून गणपतराव पाटील यांनीपत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी दादा काळे, पत्रकार आनंदा शिंगे, सुरेश कांबळे, बाळासाहेब माळी, बाळासाहेब कांबळे, संदीप बावचे, संतोष बामणे, संजय सुतार, चंद्रकांत भाट, संदीप इंगळे, रविराज ऐवळे, सयाजी शिंदे, संजय शिंदे, पंकज शहापुरे, शंकर कांबळे, प्रा. सचिन पाटील कणंगलेकर, विनायक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.