प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी , शिवसंघर्ष फाउंडेशन व संघर्षनायक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने सांगली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने यांना संतोष आठवले राष्ट्रीय अध्यक्ष आर्मी स्वराज क्रांती सेना यांच्या शुभ हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श लोकसेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
विजयमाला माने यांनी तीन हजार महिलांना आतापर्यंत counseling करुन कुटुंब घर संसार बसवण्याचा कार्य केलेला आहे बचत गट महिला संस्था सक्षम करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम 200 बचत गट सोलापूर पुणे अहमदनगर सांगली येथे सक्षम केलेले आहेत
कोरोना कालावधीमध्ये पाचशे महिलांना अन्नधान्य सुद्धा वाटप करून मदत केलेले आहे तसेच कॉलेजमधील युवक युवती तसेच 15 ते 45 वयोगटातील महिलांना मार्गदर्शन करून त्यांना वैयक्तिक विकासासाठी मार्गदर्शन केले आहे राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याने सांगली जिल्ह्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे