सांगली : ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन , महाराष्ट्र नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली : ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन , महाराष्ट्र नूतन पदाधिकाऱ्यांच्या  निवडी जाहिर  करण्यात आल्या.यावेळी संस्थेचे  राज्याचे अध्यक्ष डॉ. सागर बोराडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले. सांगली जिल्हा अध्यक्षपदी साप्ताहिक अर्थ राज्याचे प्रकाशक अल्ताफ खतीब यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली . 





सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी साप्ताहिक महान नेता चे संपादक शाहीर खराडे व  सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी साप्ताहिक नाभिक बांधव चे संपादक रोहित जाधव या दोघांची निवड करण्यात आली. साप्ताहिक संदेश लहरी चे संपादक जगन्नाथ पाटील  यांची सांगली जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. साप्ताहिक सजग सांगलीचे संपादक निलेश पवार  यांची सांगली जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली. साप्ताहिक सांगली आमंत्रण संपादक तौफिक मौलवी  यांची सांगली जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली. साप्ताहिक नव प्रसारणचे संपादिका गीता मुधोळकर  यांची सांगली जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली.

साप्ताहिक सत्य आशा संपादक मुंकुंद भोरे  यांची सांगली जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली.  सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष साप्ताहिक कुंभशिल्पचे संपादक नित्यानंद कुंभार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे उपाध्यक्ष साप्ताहिक विराटशक्तीचे सहसंपादक अशोक पवार , मिरज तालुका अध्यक्षपदी युवा ग्राम वार्ताचे संपादक धैर्यशील मोरे , जत तालुका अध्यक्षपदी जत दर्शनचे संपादक सुरेश राठोड , वाळवा तालुका अध्यक्ष पदी आपली बातमी या साप्ताहिकाचे संपादक दत्तराज हिप्परकर शिराळा तालुका अध्यक्षपदी नाभिक बांधवचे संपादक रोहित जाधव यांची निवड करण्यात आली. कवठेमहंकाळ तालुका अध्यक्षपदी बहुजन कामगार दर्पण संपादक शंकर माने ,कडेगाव तालुका अध्यक्षपदी वाळवा मुखपृष्ठच्या संपादिका शबाना मुजावर ,साप्ताहिक सातारा वासी  संपादक अबुबकर शेख  यांची कराड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. साप्ताहिक सातारा वार्ता  संपादिका कामिनी पाटील यांची सातारा राज्यकार्यकारणी व सातारा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी नुकतेच निवृत्त झालेले चित्रकला विभागाचे शिक्षक व सारांशचे संपादक डॉ. अनिल दबडे यांचा संस्थेच्या सर्व संपादिकाच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. 

  सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाची समिती जाहीर करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व साप्ताहिक विराट शक्तीचे संपादक विजयकुमार पोतदार संस्थेचे खजिनदार व साप्ताहिक घर प्रमुख चे संपादक धोंडीराम अण्णा शिंदे संस्थेचे सचिव प्रगत हिंदुस्थान चे संपादक दीपक ढवळे संस्थेचे विधी सल्लागार व आवाज हिंदू एकताचा  या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक बाळासाहेब वाघमोडे  यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली तर स्वागत प्रास्ताविक दिपक ढवळे यांनी केले तर आभार बाळासाहेब वाघमोडे यांनी मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post