प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय तारा येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमास युसुफ मेहेरअली सेंटर या संस्थेचे कार्यकारीनी सदस्य अनिल कांबळे हिंदूस्थान कंस्ट्रक्शन कंपनी आपटा फाटा येथील जनरल मॅनेजर चर्तुवेदी साहेब, नायर साहेब साईहरि ट्रस्टचे मुंगेकर साहेब शालेय समिती उपाध्यक्ष संतोष पाटील गृपग्रामपंचायत कर्नाळा सरपंच व सभासद खारपाडा दुष्मी ग्रामपंचायतचे सदस्य व पंचकोशीतील पालक ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यकमात शाळेतील विदयार्थ्यांनी समाजात जागृती व समाज प्रबोधन व्हावे म्हणून विविध गीत नाटय कार्यक्रम सादर केले मनोरंजनातून प्रबोधन करताना विदयार्थ्यांनी आपली कला सादर केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश्री पाटील, पायल पाटील यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन म्हात्रे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था युसुफ मेहेरअली सेंटर, तारा ग्रामस्थ, शालेय समिती व शाळेतील सर्व कर्मचा-यानी एकत्रित सहकार्य व मदत केली.