प्रेस मीडिया लाईव्ह विशेष
सुनील पाटील प्रतिनिधी :
वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील या महान क्रांतिकारकांना आदरांजली देण्यासाठी प्रथमच खांडस ते सिद्धगड क्रांतीज्योत घेऊन जाण्यात भव्य क्रांतीज्योत आयोजित करण्यात आली असून हुतात्मा प्रतिष्ठान खांडस कडून आदरांजली देण्यात आली असून हुतात्मा प्रतिष्ठान खांडस यांच्यावतीने भव्य क्रांतीज्योत खांडस ते सिद्धगड आयोजित करण्यात आली होती.
यासाठी खांडस परिसरातील तरुण युवक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांनी दिलेले देशासाठी बलिदानाला आदरांजली म्हणून क्रांतीज्योत म्हणजेच मशाल पेटून अदरांजली वाहिली व वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांनी आपल्या देशासाठी केलेले भव्य दिव्य कार्य ही संपूर्ण कर्जतकरांना आणि देशवासीयांना कलावे यासाठी क्रांतीज्योत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रथमच आयोजित केलेली खांडस परिसरातील क्रांतीज्योत पदयात्रा यशस्वी रीतीने पार पडली व यासाठी सर्व तरुणांचा आणि ग्रामस्थांचा खूप मोठा प्रतिसाद लाभला व क्रांतीज्योत यात्रा यापुढे अशाच प्रकारे खांडस ते सिद्धगड दरवर्षी हुतात्मा प्रतिष्ठान खांडस परिसर यांच्यावतीने आयोजित केली जाईल हुतात्मा प्रतिष्ठान खांडस परिसरातील तरुण व युवक आणि समस्त पंचक्रोशीतील तरुण ग्रामस्थ उपस्थित होते