जातीय धर्माचे पलीकडे जाऊन तुम्ही केलेल्या कार्याला आम्ही सलाम करतो


प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्रातील नामवंत डॉ. संग्राम पाटील कोरोना काळात लंडन येथे राहून जागतिक पातळीवर covid-19 चा बारकाईने अभ्यास करून महाराष्ट्रातील व तसेच भारतातील जनतेला कोरोना या आजारापासून कसं दूर ठेवता येईल. या आजाराचा धोका किती गंभीर आहे. यातून आपला बचाव कसं करावा. सामान्य जनतेने काय खबरदारी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारने या जागतिक महामारीचा मुकाबला कसा करावा याबाबतचे शेकडो   व्हिडिओ तयार करून  सुरुवातीला भारतात कडक लॉकडाऊन असताना देशातील अनेक लोकांना मार्गदर्शन करीत होते

आपण न ऐकलेलं नावाचं आजार covid 19 भारतात दाखल झाला होता. कोणालाही या आजाराबाबत काहीच माहित नव्हतं डब्ल्यू.एच.ओ सुद्धा संभ्रमात होती. केंद्र सरकार तर टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, नमस्ते ट्रम्प तर निवडणुकीच्या रॅलीमध्ये विश्वगुरू नरेंद्र मोदी व्यस्त होते. तर दुसऱ्या  ठिकाणी काही संघवादी, मनुवादी मानसिकतेचे लोक, गोदी मीडिया  तबलीग जमात, कोरोना बॉम्ब, कोरोना जहादी करीत लोकांमध्ये द्वेष निर्माण करीत होते. तर मानवतावादी विचार ठेवून लंडन येथे राहणारे समाजात काम करणारे डॉ. संग्राम पाटील सारखे डॉक्टरांनी लोकांना या भयंकर आजारापासून वाचविण्याचे प्रयत्न करत होते. अशा महामारीत शासन व प्रशासनातील अधिकारी, कोरोनाने मरण पावलेल्या सर्व धर्मीय अंत्यसंस्कार करणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना संग्राम पाटील मार्गदर्शनकरीत होते. त्यांनी केलेला मार्गदर्शन आम्हाला खूप फायदेशीर ठरला. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, व आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे स्वतः डॉ. संग्राम पाटील यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून महाराष्ट्र सरकारलाही योग्य सल्ला देत होते. जेणेकरून इतर राज्याचे तुलनेत आपल्या महाराष्ट्रातील परिस्थिती खूप चांगली होती.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""

 कोरोना आणि मोदी सरकार या विषयावर पुण्यात कोथरूड येथे डॉ. संग्राम पाटील यांची भेट झाली. भेट खूप छोटीशी होती मात्र त्यांना भेटून मला खूप आनंद झाला. कोरोना काळात त्यांचे दररोज येत असलेल्या व्हिडिओला मी व माझ्यासोबत अंत्यविधीचा काम करणारे सहकारी मित्र  सतत पाहत होतो . कारण जे काम आम्ही करत होतो तो खूप रिस्की होता कोणताही कार्यकर्ता आमच्यातला दगावला गेले नाही  पाहिजे कोणाचाही नुकसान होता कामा नये म्हणून डॉ. संग्राम पाटील यांचे व्हिडिओ आम्ही खूप आतुरतेने पाहून काम करीत होते. म्हणूनच आमच्यापैकी एकही कार्यकर्ताला पॉझिटिव्ह झाले नाही व घरात सुद्धा कुणालाही त्रास झाले नाही.

कोरोना काळात आमच्या टीमने केलेल्या कामाचा "कार्यकथन" दोन भाषेत मी 250 पानाची पुस्तक मराठी व इंग्रजी भाषेत छापली आहे. सदर पुस्तक त्यांना मी भेट दिली. डॉ. संग्राम पाटील यांनी आनंद व्यक्त केला व सांगितले की या महामारीचा दस्तावेज तुम्ही तयार केला. पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन केला. त्याबद्दल तुमचे व तुमच्या संघटनेचा आम्ही अभिनंदन करतो. महामारीत काम करीत असताना आम्ही तुम्हाला दररोज त्यावेळी टीव्हीवर बघत होतो. जातीय धर्माचे पलीकडे जाऊन तुम्ही केलेल्या कार्याला आम्ही सलाम करतो. नक्कीच कोरोना मृत्यूनंतर... नाते मानवतेचे / Being Humane Amidst Corona crisis... पुस्तकाचा मी वाचन करणार व तुमच्या पुस्तकाला लवकरच अभिप्राय सुद्धा देणार.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""

डॉ. संग्राम पाटील यांना पुस्तक भेट देताना गांधीवादी नेते माजी आमदार. डॉ. कुमार सप्तर्षी, सहकारी मित्र इब्राहिम यवतमाळ, अंजुम इनामदार. अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच. 9028402814*छायाचित्रात दिसत आहे

Post a Comment

Previous Post Next Post