प्रेस मीडिया लाईव्ह :
सोमवार दिनांक 29/1/2024 मा.शिक्षण आयुक्त पूणे येथे कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कला शिक्षक संघ यांचा कला शिक्षक पद भारती पवित्र पोर्टल मार्फत करावी, कला शिक्षक पद भरती त्वरित करावी, संच मान्यतेत पूर्वीप्रमाणे विशेष कला शिक्षक पद दर्शवावे, संच मान्यतेत दुरुस्ती करून जाचक विद्यार्थी अट काढून टाकावी या मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचं नेतृत्व कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री सुनील शिखरे.सर.व उपाध्यक्ष किरण सरोदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद शेलार, हुसेन खान यांनी केले तर कला शिक्षकांचा मोर्चा आयुक्त कार्यालयाजवळ आल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले यावेळी कला शिक्षकांना संबोधित करताना राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे . सुनील शिखरे.सर यांनी संघटनेच्या विविध मागण्याबाबत आपली भूमिका मांडली कला विषय व कला शिक्षकांवर कसा शासन अन्याय करते हे स्पष्ट करून सांगितले. यावेळी राज्य अध्यक्ष सुनील शिखरे (सातारा ), कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी शाम साठे, महिला आघाडीच्या अनिता वाघ, पुरंदर तालुक्याच्या निर्मला पानसरे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष संदीप ढेलपे राज्य भरातून आलेल्या प्रतिनिधिनींनी व मान्यवरांनी आपली आंदोलनाबाबत भूमिका मांडली,
त्यानंतर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी संघटनेचे मागण्याचे निवेदन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेबाना देण्यात आले त्यावर मागन्यानबाबत सुमारे अर्धा तास चर्चा करून कला शिक्षकांच्या मागण्या कशा रास्त आहेत हे पटवून दिले आयुक्तानी सुद्धा सकरात्मक भूमिका घेऊन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य करत 1)दुसऱ्या लॉट मध्ये कला शिक्षक भरती केली जाईल
2) विद्यार्थी संख्या 500 असेल तरच कलाशिक्षक घेण्यात यांवा असं शासन सांगतोय.त्या संबंधित मा.शिक्षण आयुक्त श्री मांढरे सरांना समजून देण्यात आले त्या संबंधित मा आयुक्त यांची भूमिका विद्यार्थी संख्या 200 व एक कला शिक्षक व एक क्रीडा शिक्षक व त्यानंतर ईतर शिक्षक भरती करावी तसेच संचमान्यांतेत कला शिक्षक दाखविला जाईल असे सांगितले व असा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करून अंमलबजावणी करण्यासाठी मा प्रशासन अधिकारी मा.श्री राजेश शिंदे सर यांना सांगितले त्या बद्दल कला व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र व पुणे जिल्हा कला शिक्षक संघटना पूणे यांनी मा शिक्षण आयुक्त श्री.सुरज मांढरे सरांचं व श्री राजेश शिंदे सर यांच आभार मानले यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी आयुक्तासमोर कला शिक्षकांच्या मागण्या लावून धरल्या त्याबद्दल सावंत सर यांचे आभार मानण्यात आले.
कला शिक्षकांच्या सर्वच मागण्या मान्य होण्यासाठी आयुक्तानी होकार दिल्यामुळे कला शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या आंदोलनाचे यश हे सर्वांचे आहे
संस्थापक हुसेन खान व पुणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी सर्वांचे आभार मानून आंदोलनाची सांगता झाली. श्री.सुनील शिखरे सर प्रदेशाध्यक्ष.व श्री.किरण सरोदे सर.उपाध्यक्ष.छत्रपती राजर्षी शाहू महाराज कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.