वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांची दादागिरी

पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा जोरदार निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

फिरोज मुल्ला सर 

पुणे :वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर  पोलिसांची दादागिरी या  मुळे कॅमेऱ्याचे नुकसान झाले असून , पत्रकारांचे मोबाईल देखील काढून घेऊन त्यांना उचलून नेण्यात आले, तर एका कॅमेरामनला पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट गाडीमध्ये डांबल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे  या बाबत  पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा जोरदार निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे

शुक्रवारी आशानगर येथे पाण्याच्या टाकीचा उद्घाटनाचा समारंभ होण्यापूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी, आमदार धंगेकर, बहिरट रमेश बागवे यांच्यासह अन्य पदाधिकारी आशा नगर येथे उपस्थित झाले. पोलिसांनी त्यांना रोखले पण धंगेकरांनी आत मध्ये जाऊन नारळ फोडून टाकीचे उद्घाटन केले. यावेळी काँग्रेस व पोलिसांमध्ये झटापट झाली.

या ठिकाणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी मज्जाव केला. त्यांच्यासोबत पोलिसांनी झटापट केली, त्यात एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्याचे नुकसान झाले. पत्रकार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कॅमेरा बंद पडल्याने मोबाईल मधून या घटनेचे वार्तांकन करत असताना पोलिसांनी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला..यामुळे आक्रमक झालेल्या पत्रकारांनी पोलिसांना जाब विचारून तेथे त्यांचा जोरदार निषेध केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणात सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. अखेर पत्रकारांच्या रोषाला सामोरे गेल्यानंतर कॅमेरामनची सुटका करून मोबाईल परत केला.

Post a Comment

Previous Post Next Post