पुणे आणि पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसऱ्या महानगरपालिकेची स्थापना होणार




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : फिरोज मुल्ला :

पुणे :  पुणे आणि पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसऱ्या महानगरपालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषदेच्या हद्दीतील भागा बरोबरच आजू बाजूच्या परिसरातील गावांचा समावेश करुन नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. याबाबतच्या हलचाली सुरु झाल्या असून संबंधित विषयासंदर्भात अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला असून याबद्दलच कामही सुरु झालं आहे.

या नव्या महानगरपालिकेच्या निर्मिती संदर्भातील प्राथमिक चाचपणी करण्यासाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या भागांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल गोळा केला जात आहे. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे अहवाल मागून घेण्यात आला आहे. तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचे हे अहवाल मागवून घेण्याबरोबरच अभिप्रायासह शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडूनही अहवाल मागविला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post