भारती विद्यापीठच्या डॉ. नेताजी जाधव यांना 'मोस्ट ट्रस्टेड डाएट अँड फिटनेस कन्सल्टंट ऑफ द इयर' पुरस्कार



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : भारती विद्यापीठचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नेताजी जाधव यांना 'अमिनंट रिसर्च, मुंबई' या संस्थेतर्फे दिला जाणारा    ' विश्वसनीय  आहार आणि व्यायाम तज्ञ 'हा पुरस्कार मिळाला.प्रसिद्ध  चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे  या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 डॉ.  नेताजी जाधव हे गेली २१ वर्षे क्रीडा आणि फिटनेस या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांनी  भारतीय खेळ प्राधिकरणाच्या  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ  स्पोर्ट्स(पटियाला, पंजाब)  येथून फिटनेस, स्पोर्ट्स कोचिंग आणि आणि स्पोर्ट न्यूट्रिशन या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी 'खेळाडूसाठी आहार आणि व्यायाम' या विषयामध्ये पी.एच.डी केली आहे.


त्यांनी आतापर्यंत खेळाडूसाठी आहार आणि व्यायाम,  वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम, मधुमेही लोकांसाठी आहार आणि व्यायाम अशा अनेक विषयांमध्ये  विविध  आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये २१ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित  केले आहेत. त्यांनी आतापर्यंत पाच हजार हून अधिक खेळाडूंना  संतुलित आहार आणि  शास्त्रशुद्ध व्यायाम याविषयी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले आहे. 


 तसेच  पाच हजार हून अधिक सर्वसामान्य लोकांना  शास्त्रशुद्ध व्यायाम आणि संतुलित आहार याद्वारे  मधुमेह नियंत्रणात आणणे, शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करणे, शरीरातील स्नायूंना सुदृढ बनविणे,  रक्तातील कोलेस्ट्रॉलची आणि चरबीची पातळी कमी करणे, लहान मुलांमधील स्थूलत्व यासाठी मार्गदर्शन केले आहे व या सर्व विषयांमध्ये अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.








Post a Comment

Previous Post Next Post