प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मध्यंतरी देशातील पहिली पर्यटन पाणबुडी सिंधुदुर्गला उभी करणार होती पण तो प्रकल्प गुजरातला पळाला गेला अशी टीका शिंदे फडणवीस पवार सरकारवर झाली होती. त्यावर सिंधुदुर्ग मधील पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्रातच होईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले मात्र दुसरीकडे नारायण राणे यांनी हा प्रकल्प ठाकरेंच्या शिवसेनेच्या काळातच गुंडाळला गेला असा प्रती आरोप केला.
एका एका मागून एक प्रकल्प गुजरातला जात असल्याची टीका होत असतानाच आता नवीन शासन आदेश ( ०६२२/प्र क्र ४६/बंदरे २, गृह दिनांक ५जाने २४) समोर आला आहे. त्यानुसार केंद्रीय बंदरे जहाज आणि जल परिवहन मंत्रालय कडून लोथल गुजरात येथे नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स म्हणजे पाण्याखालील सागरी संग्रहालय उभे करण्यासाठी ४० कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारने देऊ केला आहे. यावरून आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी जोरदार टीका केली आहे.
'सदरचा प्रकल्प केंद्र सरकारचा असून तो मुख्यत्वे पर्यटन वृद्धीसाठी आहे या प्रकल्पाचा फायदा मुख्यत्वे गुजरात मधील पर्यटन उद्योगासाठी होणार आहे. प्रकल्प केंद्र सरकारचा, उभा राहणार गुजरात मध्ये, त्या तिथे महाराष्ट्राचे दालन उभे करून त्यासाठी ४० कोटी खर्च करून महाराष्ट्राला कोणता फायदा होणार? हे सर्व महाराष्ट्राच्या पैशातून होणार त्यापेक्षा महाराष्ट्रातील सागरी कर्तृत्वाचे, वारशाचे संग्रहालय कोकण किनारपट्टीवर उभे करणे हे अधिक योग्य ठरेल.'
मोदींच्या गुजरात चरणी महाराष्ट्राने आपला मान आणि भान अर्पण करू नये अशी टीका आप चे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
आम आदमी पार्टी, मिडिया टीम