प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कात्रज भाजी मंडई परिसरात एकाचा डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कात्रज चौकात भाजी मंडईच्या कोपऱ्यावर आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. सकाळी नागरीक या रस्त्याने जात असताना एका व्यक्तीची नजर रस्त्याच्या कडेला पडली. त्यावेळी एका व्यक्तीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह तेथे आढळून आला.
पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तपासात हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मनोहर बागल असल्याचे समजले आहे . मनोहर यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे . हत्ये मागचं कारणं काय हे अद्याप समजू शकलेलं नाही.
सदर घटनेचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.