प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शरद मोहोळ यांच्यावर घरातून बाहेर पडताच गोळीबार केला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समोर आले आहेत. या सीसीटीव्हीमध्ये अगदी जवळूनच शरद मोहोळ याच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहेत.आरोपींना एकूण चार गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी या ठिकाणावर पळ काढला. घरासमोर घडलेला हा प्रकार घरच्या मंडळींनी पाहिला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या शरद मोहोळ याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना मोहोळ याचे निधन झाले.
शरद मोहोळ याच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनी गोळीबार केल्याचे दिसत आहे. आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. या हल्ला प्रकरणात दोन नामांकित वकिलांचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे . रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी त्यांची नावे आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही इतर आरोपीं सोबत रात्री अटक केली आहे . अटक करण्यात आलेले दोन वकिलांनी आरोपींना पळून जाण्यात मदत केली. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्येचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिस करत आहे.
दरम्यान या शरद मोहोळ प्रकरणात आठ आरोपींना अटक केली
साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे), नामदेव महीपती कानगुडे (वय ३५, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे), चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे), विनायक संतोष गाव्हणकर (वय २०, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे), अॅड. रविंद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे), अॅड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी कॉलनी कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.