कोंढवा भागात ८ वर्षीय मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले .



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : येथील  कोंढवा भागात ८ वर्षीय मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून आणि अर्धवट नंबर प्लेटवरून शोधून काढत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले . 

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे नितीन मारुती ननावरे (वय ४५, रा. धनकवडी)  त्याच्याकडून संबंधित दुचाकी ताब्यात केली.  यापूर्वीचे देखील त्याच्यावर विनयभंगाचे पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. बलात्काराच्या एका गुन्ह्यात त्याने दहा वर्षे शिक्षादेखील भोगली असल्याचे माहिती समोर आली आहे असे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे. 

पोलिस खात्याची उत्कृष्ट कामगिरी ........

सदरचा  तपास वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक निरीक्षक दिनेशकुमार पाटील, अंमलदार सतीश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, सागर भोसले, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post