संस्कृत भाषा व्यवहारात आणण्यासाठी चळवळ उभारावी’


प्रेस मीडिया लाईव्ह :

  पुणे : आपल्याला संस्कृत भाषा ही जीवनमूल्ये शिकविते. समाज जोडण्याची संवेदना संस्कृत भाषेत असून ती आपल्या मनात आली पाहिजे. संस्कृत भाषेचा खर्‍या अर्थाने प्रचार-प्रसार करण्यासाठी ती व्यवहारात वापरली गेली पाहिजे. संस्कृत भाषेचा व्यवहारात आणण्यासाठी आपण सर्वांनी मोठी चळवळ उभी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत खादी ग्रामोद्योग कमिशनचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी व्यक्‍त केले. संस्कृतमध्ये ऐकत्वाची भावना असून ती व्यवहारात आणल्यास एकत्मता आणखी वाढेल, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

            संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत पुणे महानगर सिंहगड जनपद आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांचे संयुक्तविद्यमाने रविवारी स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात एकदिवशीय वाग्विलासिनी संस्कृत संमेलनाचे उदघाटन बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थान संस्कृतभारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतमंत्री विनय दुनाखे यांनी भूषविले. याप्रसंगी खादी ग्रामोद्योग कमिशनचे अध्यक्ष रवींद्र साठे, स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे सदस्य सुधीर काळकर, संस्कृतभारतीचे अ.भा. संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी, संमेलनाच्या संयोजिका व संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत पुणे महानगर सिंहगड जनपदच्या वैखरी कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन मान्यवरांनी केले.

                रवींद्र साठे म्हणाले, प्राचीन संस्कृत भाषेचा वारसा देशासाठी महत्त्वाचा असून त्याचे आपण जतन केले पाहिजे. संस्कृत वारसा जपल्यास आणखी देशाच्या प्रगतीमध्ये वाढ होईल. संस्कृत भाषेचे महत्त्व, परंपरा समजून घेतली पाहिजे. संस्कृतभाषेच्या अध्ययनामुळे आपल्या उच्चाराबरोबरच जगण्याची जीवनमूल्ये आपल्याला माहिती होते. स्वामी विवेकांनद,  लोकमान्य टिळक यांनी संस्कृत भाषा आत्मसात करुन आपले जीवन यशस्वी केले. जगण्याची जीवनमूल्ये त्यांनी व्यवहारात आणली. संस्कृत भाषा दैवी साक्षात्कार असून तीन व्यवहारात आणण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

                शिरीष देशपांडे, म्हणाले, दैनंदिन जीवन व्यवहारात आपले भाषाप्रेम कृतीतून व्यक्‍त झाले पाहिजे. भाषा प्रेमाच्या जोडील संवेदनशीलता असेल तर माणसे जोडण्याचे कामही त्यातून होईल. अनेकवेळा संस्कृतभाषा वेडीवाकडी बोलून भाषेची थट्टा केली जाते. संस्कृत भाषेला मोठे वैभव असून ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.

                विनय दुनाखे म्हणाले, संस्कृत भारती गेली 42 वर्षांपासून संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविते. त्यामध्ये शिबिर, परिसंवाद, चर्चासत्रे, संस्कृतवर्ग यासह विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतात. संस्कृत ही जनभाषा व्हावी याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न केला जात असून सर्वांनी चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

                     संमेलनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ लेखक संजय उपाध्ये प्रमुख वक्ते म्हणून  उपस्थित होते.  संस्कृतभारतीचे अ.भा. संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी, रामचंद्र शिधये यावेळी उपस्थित होते.

                संजय उपाध्ये म्हणाले, संस्कृत प्रचार-प्रसाराबरोबरच भाषेची विक्रीदेखील आपल्याला करता आली पाहिजे. काळ झपाट्याने बदलत आहे. तंज्ञज्ञानातही रोज नव्याने बदल होत आहे. त्यामुळे संस्कृत तळागाळापर्यंत पोहचविण्याठी त्यांची जाहीरातबाजी आपल्याला करावी लागणार आहे. सध्या धर्म आणि भाषेमध्ये सुरंग लावला आहे. मराठी मिडियम, इंग्रजी मिडियम सुरु आहे. त्यामुळे संस्कृत भाषा रुजविण्यसाठी मखर करावे लागणार आहे. संस्कृत भाषेत दर्जा असूनही आपण विक्रीमध्ये मागे पडतो. येता-जाता आपल्या पाल्यांवर संस्कृत भाषेचा शिकण्याठी विविध संकल्पनाचा वापर करावा लागणार आहे. संस्कृत भाषा टिकविण्यासाठी नवनवीन कल्पना कृतीत आणावी लागणार आहे. संस्कृत भाषेचे चिंतन करा. तसेच ही भाषा जगासमोर मांडून प्रचार आणि प्रसार करा असेही यावेळी संजय उपाध्ये यांनी सांगितले.

                देवपुजारी म्हणाले, घरा-घराघरात, सोसायटी, गावागावामध्ये संस्कृत भाषो पोहचवा. ही भाषा वापरण्याचा संकल्प करु. आपले घर संस्कृत झाले तर गाव होईल, गाव झाले तर देश होईल. आसाम आणि मध्यप्रदेशातील दोन गावे पुर्णत संस्कृत आहे. त्या ठिकाणचा सर्वांगिण विकास झाल्या असल्याचे यावेळी उदाहरणासह स्पष्ट केले.

                वैखरी कुलकर्णी म्हणाल्या, संमेलनामध्ये संस्कृत भाषेबद्दल आपल्या मनात असणारे कुतूहल प्रत्यक्षात मुलांनी अनुभवली. संस्कृत भाषेचा इतिहास, भाषेतील विज्ञान, साहित्य कला अश्या अनेक विषय संस्कृत भाषेच्या प्रदर्शनातून मुलांनी घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स.प. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या डॉ. भारती बालटे यांनी केले. तर सुधीर काळकर यांनी आभार मानले.

          दिवसभराच्या संमेलनात  आयुर्वेद, संगणकाद्वारे भाषा विश्‍लेषण, भारतीय गणित आणि संस्कृत या विषयावर परीसंवाद झाला. वाईच्या किसान वीर महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका अंजली पर्वते अध्यक्षस्थान भूषविले होते, तर परिसंवादात वैद्य अनंत पाटील, प्रांजली देशपांडे, रमा क्षीरसागर, श्रेया लोणीकर  यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व संस्कृत गीतरामायण सादर केले.


Post a Comment

Previous Post Next Post