प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य शिवाजीराव कामथे, सचिव पदी प्राचार्य राज मुजावर यांची निवड झाली आहे. कामथे हे रामराज्य विद्यालयाचे प्राचार्य आहेत तसेच पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष आहेत तर मुजावर हे अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे प्राचार्य व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत.
पुणे माध्यमिक सहकारी पतसंस्थेची पदाधिकारी निवडी बाबतची वार्षिक सभा पतसंस्थेच्या कार्यालयात आर.पी. बनाईत (अध्यासी अधिकारी,सहकार खाते, महाराष्ट्र शासन) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या.पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी अशोक विद्यालयाचे धोंडीबा तरटे, खजिनदारपदी नूमवि विद्यालयाच्या डॉ.मंगल शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे माजी अध्यक्ष विजय कचरे तसेच सर्व उपस्थित संचालकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राज्य टीडीएफ चे कार्याध्यक्ष जी.के.थोरात यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांनी पतसंस्थेच्या सभासदाच्या आर्थिक हिताच्या रक्षणाबरोबरच येणाऱ्या काळामध्ये कर्जावरील व्याज कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातीलतसेच पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणात सभासद वाढीसाठी अभियान राबवले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष विजय कचरे, नरेंद्र नागपुरे, महादेव माने,सौ हर्षा पिसाळ, दत्ता हेगडकर, पुष्पक कांदळकर, संदीप घोलप, मधुकर नाईक, लोंढे सर, तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक संदीप सुतार , दीपक नवसकर, आनंद घारे, ज्ञानेश्वर कानवडे व अलोक कंक उपस्थित होते.