महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आज शनिवार दि. २७ रोजी सकाळी साडेदहा वाजता भेट घेणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गोखलेनगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले ज्ञानेश्वर चौतमल आणि निखिल करंदीकर यांना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी धक्काबुक्की करुन त्यांचा कॅमेरा व मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या घटनेतील जबाबदार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आज शनिवार दि. २७ रोजी सकाळी साडेदहा वाजता भेट घेतली जाणार आहे. सर्वांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात यावे.
-किरण जोशी
प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
सीताराम लांडगे
राज्य सरचिटणीस - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
पंकज बिबवे
पुणे शहराध्यक्ष - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
सागरराज बोदगिरे
राज्य संपर्क प्रमुख- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
आणि सर्व पदाधिकारी व सदस्य