संविधान ग्रुप,लोकशासन पार्टीचे आयुक्तांना पत्र
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :'माजी नगरसेवक अरविंद शिंदे हे महापालिकेतील अधिकाऱ्यांना नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव आणतात आणि ऐकले नाही की बदली,चौकशीची धमकी देतात. मागासवर्गीय अधिकाऱ्यांना या प्रकारचा त्रास होत असून याची दखल घेऊन अरविंद शिंदे यांच्यावर पालिकेत येण्याबाबत बंधने घालावीत',अशी मागणी संविधान ग्रुप आणि लोकशासन पार्टी ऑफ इंडियाने आज महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
आज या संघटनांनी पालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात ही मागणी केली आहे.'पालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यांना याचा अधिक त्रास होत असून कोणीही बदल्या करण्याची धमकी देऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकणार नाही,याची काळजी आयुक्तांनी घ्यावी.पालिकेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी योग्य ती कारवाई करावी',असे या निवेदनात म्हटले आहे.
संविधान ग्रुपचे अध्यक्ष सचिन गजरमल,संस्थापक राकेश सोनवणे,लोकशासन पार्टीचे अध्यक्ष रमेश कोल्हे,सुनीता रिठे,सागर अडागळे,भागवत कांबळे,संदीप बिराजदार यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे आज ५ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले.