अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचे आठ महिला पोलिसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मुंबई : महाराष्ट्रामध्ये महिला पोलीसच सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.पोलीस दलातील महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवत त्यांच्यावर होत असलेले अत्याचार समोर आणले आहेत. मुंबईतील 8 महिला पोलीसांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहित पोलीस अधिकारी त्यांच्यावर बलात्कार व अत्याचार करत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या लेटर बॉंम्ब मुळे पोलीस दला मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या नागपाडा मधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंट मधील आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलं आहे. यामध्ये एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी गंभीर आरोप केले आहेत. तुम्हाला कमी काम लावतो, असे अमिष दाखवून महिला पोलीसांचं शोषण केलं जातं असल्याची गंभीर बाब या पत्रामध्ये मांडण्यात आली आहे. पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन या महिला पोलिसांवर अत्याचार केला गेल्याची माहिती आहे.
सरकारी निवासस्थानी आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप आठ महिला पोलीसांनी या पत्राद्वारे केला आहे. या पत्राने सरकार व पोलीस दलाची झोप उडाली असून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राज्यामध्ये सर्वांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलीस दलामध्ये महिला पोलीसच सुरक्षित नसल्याने सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहेत. या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांकडून करण्यात आली आहे. या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली असून चौकशीही सुरु करण्यात आली आहे.