डॅा. दीपक हरके यांचा अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते 'इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड' देऊन सन्मान



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी :  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक आणि १८२ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके यांना 'इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.

   दिल्ली येथील रॅडीसन ब्ल्यू हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या एज्युकेशन समिट मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते डॉ. दीपक हरके यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय माजी उपाध्यक्ष श्याम जाजू, ब्रह्माकुमारी सरोज दीदी आदी उपस्थित होते.

भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. हरके यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. हरके यांना मिळालेल्या सन्मानामुळे राजयोग केंद्रांमधील युवा प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post