ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण

 जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय) 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन


प्रेस मीडिया लाईव्ह :

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. 

अशोक सराफ यांनी  केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून  घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे

Post a Comment

Previous Post Next Post