प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- 6 जानेवारी पत्रकार दिनांचे औचित्य साधून कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात उत्कृष्ट पत्रकार म्हणुन संतोष पाटील तर उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणुन बी.डी.चेचर आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयातुन एबीपी माझाचे विजय केसरकर आणि फोटोग्राफर निलेश शेवाळे यांना पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे आणि त्यांच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे.या वेळी उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्यासह सर्व संचालक ,पत्रकार,छायाचित्रकार आणि प्रिंट मिडीया तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकार बंधू -भगिनी उपस्थित होत्या.