प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शहरात महानगरपालिकेकडे आरोग्य कर्मचारी आहेत म्हणुन शहराची सफाई होत आहे.जर सफाई कामगार नसते तर शहरात रोगराई पसरुन हाहाकार माजला असता. प्रत्येक वॉर्डात आरोग्य कर्मचारी हा पहाटे पासून स्वच्छता प्रामाणिक पणे करीत असतो.
कर्मचारी हा कामावर आहे का नाही या साठी दोनदा पंचिंगची सक्ती केली आहे.त्यामुळे कामगार कमी जास्त आहेत का नाही हे त्यांच्या वरिष्ठांना समजून त्या प्रमाणे कामाचे नियोजन केले जाते.सर्वच कामगार कामात कसुर करतात असे म्हणता येणार नाही.हे कामगार प्रत्येक भागात सकाळी लवकर स्वच्छता करत पुढ़े गेलेले असतात.साखर झोपेत असलेले काही नागरिक आपल्या दारातील स्वच्छता होऊन ही जमलेला कचरा रस्त्यावर ढ़कलत असत.त्यामुळे काहीना आरोग्य कर्मचारी याने सफाई न केल्याचे वाटते.
यात काही लहान मोठे व्यापारी आणि काही किरकोळ हातगाडी वालेही जमलेला कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे दिसून येते त्यामुळे याचे खापर आरोग्य कर्मचारी यांच्यावर फोडता येत नाही.याला नागरिक ही तितकेच जबाबदार आहेत.आरोग्य कर्मचारी हा सफाईसह गटारीही साफ करीत असतो.पण काही नागरिक नको त्या वस्तु गटारीत टाकत असतो त्यामुळे गटारी तुंबलेली असतात.आरोग्य कर्मचारी हा सांगितलेले योग्यरित्या पार पाडतो की नाही या साठी त्यांच्यावर मुकादमाची नजर असते.