पोलिस निरिक्षकांच्या बदल्यांचे आदेश ,कोल्हापुरात नवीन पोलिस निरीक्षकांची वर्णी.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - जे पोलिस अधिकारी स्वतःच्या जिल्हयात कार्यरत आहेत आणि त्यांची त्या जिल्हयात  मुदत संपलेली आहे अशा  28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुल्लारी यांनी सोमवारी रात्री काढ़ले असून   बदली झालेल्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर रहाण्याचे आदेश ही दिलेत.

कोल्हापुर जिल्हयात असलेले पोलिस निरिक्षकांच्या बदल्या अशा -अविनाश कवठेकर -सातारा ,भैरु तळेकर -सांगली ,राजेंद्र मस्के -सातारा ,प्रकाश गायकवाड-सांगली ,अरविंद काळे-सातारा ,संतोष घोळवे -पुणे ग्रामीण आणि संदिप कोळेकर यांची सांगली येथे झाली आहे.तसेच सांगली जिल्ह्यातील 3 ,सातारा जिल्ह्यातील 4,पुणे येथील 5 या प्रमाणे पोलिस निरीक्षकांचा बदली झालेल्यात समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post