कोल्हापूर मनपाच्या वरिष्ठांकडुन आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठीस .


प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे:

कोल्हापुर - कोल्हापूर महानगरपालिकेने पंचिंग द्वारे हजेरी सक्तीची केली असून त्याची सुरुवात कोल्हापूरच्या आयुक्त यांनी स्वतः पासून केली असल्याने महापालिकेच्या अधिकारयां पासून ते सफाई कामगारां पर्यंत पंचिंग द्वारे हजेरी लावत आहेत.

काही कर्मचारी उशीरा येत असल्यामुळे वरिष्ठा कडुन त्याच्यावर कारवाई होत आहे.गेल्या काही महिन्यापासून फक्त आरोग्य विभागातच कारवाई होत असल्याचे दिसत आहे.कारण काय तर बसून असल्याच्या कारणावरुन वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.एक तर सफाई कामगार पहाटे पासून शहराची स्वच्छता ऊन,थंडी ,वारा आणि पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता काम करीत असतो.जर एक दोन मिनीटे विसावा घेतला तर लगेच कारवाई.पण बाकीच्या विभागात काम करणारे कामात टंगळ  मंगळ करीत मोबाईल हाताळीत टाइम पास करतात त्याच्यावर कारवाई नसल्याचे असे काहींचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागातील जे कामगार कामचुकार आहेत जे वारंवार उशीरा येतात त्यांच्यावर कारवाई अवश्य करा .आमचे काही म्हणणे नाही , पण जे सफाई कामगार प्रामाणिकपणे काम करतात आणि जरा विसावा घेतला तर लगेच कारवाई करून नोटीस बजावतात हे जरा चुकीचे असल्याचे बोलले जाते.जर कामात कसुर होत असल्यास कारवाई करायचीच असेल तर फक्त आरोग्य विभागातील कर्मचारी यांना लक्ष न करता प्रत्येक विभागातील काम चुकार तसेच उशीरा येणारयांवर कारवाई करावी .अशी मागणी होत आहे.अलीकडच्या काळात ज्या काही आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर होत असलेला अन्याय यात मा.आयुक्त यांनी लक्ष घालून सफाई कर्मचारी यांना  दिलासा मिळावा अशी काहीच्या कडुन अपेक्षा आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post