प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-कोल्हापुर जिल्हयाचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना पदावरून काढून टाकल्याने यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार डॉ.मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल करून येथुन पुढ़े ही आपण शिवसैनिकच म्हणुन कार्यरत रहाणार असल्याचे सांगून मातोश्री हे आपले सर्वस्व आहे.
जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी मिडीया समोर बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली.या मागे मिणचेकर आणि अंधारे यांचाच हात असल्याचे म्हणत त्यांना शोक आवरला नाही.ते ढ़सा ढ़सा रडू लागले .मी जिल्हा प्रमुख असताना आता प्रर्यत झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकंणगले मतदार संघात बाहेरुन आलेल्या उमेदवाराला शिवसेनेने पाठबळ दिले त्यांनीच शिवसेना संपविण्याचे काम केले असल्याचे सांगून अशा उमेदवारा कडुन शिवसेनेला कोणता फायदा झाला असा ही प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.