प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-मेकर ग्रुपच्या संचालका विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून यातील प्रमुख संशयीत असलेला रमेश महादेव वळसे -पाटील यांच्यासह 10 जणांना आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली असून आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपीची स्थावर मालमत्ता 2 कोटी 35 लाख 14 हजार 937 रु.ची जंगम मालमत्ता आणि 2 लाख 10 हजार जप्त करण्यात आले आहे.तसेच 1 लाख रुपयांची एफडीही सिल करण्यात आली आहे.सदर मिळकतीवर एमपीआयडी कायद्याअंतर्गत उपविभागीय अधिकारी करवीर ,कोल्हापुर यांची नेमणूक केली असून यातील मुख्य आरोपीची खेड तालुक्यातील काकुरडी आणि पुणे येथील आकुर्ड़ी येथे असलेला फ्लॅट अशा नवीन मिळकतीची माहिती मिळाल्याने त्याच्यावरही कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी केली आहे.