प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले:
कोल्हापूर ता.08 : महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन बहुउद्देशीय ब्राह्मण संघ यांच्याकडून 21000 हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमी साठी दिल्या. सदरच्या शेणी आरोग्य निरिक्षक महेश भोसले यांच्याकडे सुर्पद केल्या. यावेळी जयंती परळीकर, केदार वाघपुरकर, संजय जोशी, अवधूत जोशी उपस्थित होते.