संवेदनशील भागांत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-शहरात संवेदनशील भाग असलेला कनाननगर ,राजेंद्रनगरसह इतर भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून या कारवाईत काही ठिकाणी शस्त्रे पोलिसांना हाती लागली असून ती जप्त करण्यात आली आहेत.

रेकॉर्डवरील काही संशयीत गुन्हेगारांची धरपकडही चालू केली.या दरम्यान याभागातील नागरिकांसह महिलांशीही अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी संवाद साधत काही तुमच्या तक्रारी असतील तर भिऊ  नका पोलिस तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी संवेदनशील भाग असलेल्या राजेंद्रनगर येथे कोंम्बिंग ऑपरेशन राबवून सराईंताचा शोध घेतला.तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या मदतीने शाहुपुरी पोलिसांनी कनानगगर येथे संशयीताची धरपकड रात्री उशिरापर्यंत चालू होती.

या कारवाईत काही संशयीताना पकडले.या कारवाईत.या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,शाहपुरीचे अजयकुमार सिंदकर ,राजारामपुरीचे अनिल तनपुरे यांच्यासह शीघ्र कृती दल आणि पोलिसांसह भाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post