प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शहरातील सर्व मंदीर परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.डीप क्लिंनीग मोहिमेअंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अंबाबाई मंदीर परिसरात स्वच्छता केली यांच्या समवेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार ,कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.के.मंजुलक्ष्मी यांनीही मंदीर परिसरात स्वच्छता केली.
पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत मंदीर परिसरात स्वच्छता केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव व रविकांत अडसुळ,उपायुक्त शिल्प दरेकर ,देवस्थान समितीचे सुशांत बनसोडे ,व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह भागातील नगरसेवक,स्वयंसेवी संस्था,कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध भागातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.