प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -इनरव्हील संस्थेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आणि इनरव्हील डिस्ट्रीक 317 च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त "स्वर्ण बहार "20 आणि 21 जानेवारी हॉटेल सयाजी येथे आयोजित केले आहे .
या राष्ट्रीय परिषदेचे यजमान पद या वर्षी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापुर सनराइजला मिळाले आहे.अशी माहिती डिस्ट्रीक्ट चेअरमन वैशाली लोखंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.ही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरजुंना मदत करणारी महिलांचे संघटन करून त्यांना मदत करते.या संस्थेची 1924 साली स्थापना झाली आहे.तर डिस्ट्रीक्ट 317 याची 1974 साली झाली असून याच्या सत्तर संघटना कार्यरत आहेत.
याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह गोवा ,कर्नाटकात आहे.या दोन्हीचे शताब्दी वर्ष आणि सुवर्ण वर्ष असल्याने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे माजी खजानिस विद्युत शाह यांनी सांगितले.या अधिवेशनासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रीती गुगनानी यांची प्रमुख उपस्थिती आहे.या पत्रकार परिषदेस उत्कर्षा पाटील,ममता गद्रे ,रितु वायचळ,स्मिता खामकर आदी उपस्थित होते.