महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत रस्ते विकास प्रकल्पाचे मंगळवारी उद्घाटन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

संभाजी चौगुले :

कोल्हापूर  : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस 100 कोटीचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून शहरातील मुख्य 16 रस्ते करण्यात येणार आहे. 

या कोल्हापूर शहराच्या रस्ते विकास प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा मंत्री वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते मंगळवार, दि.16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मिरजकर तिकटी येथे करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार धनंजय महाडीक, संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, श्रीमती जयश्री जाधव, ऋतूराज पाटील, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव व शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. तरी यावेळी सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post