वकिली पती पत्नीची गुंडानी हत्या केल्या प्रकरणी कोल्हापुरात वकिलांचे एक दिवसाचे काम बंद करून संरक्षण कायद्याची मागणी.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे ;

कोल्हापुर- कोल्हापुरातील जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकिल Ad.राजाराम आढ़ाव आणि त्यांची पत्नी Ad.मनिषा आढ़ाव यांची गुंडानी अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.30) रोजी एक दिवस वकिली कामकाज बंद ठेऊन सरकारने वकिल संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले.या मुळे आज न्यायालयात शुकशुकाट होता.गुंडानी आढ़ाव पती पत्नीचे पाच लाखांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण करून खून केला .या घटनेने वकिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.याकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस कामकाज बंद ठेऊन निषेध केला.

या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांना देण्यात आले.या वेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत देसाई,उपाध्यक्ष विजयसिंह पाटील यांच्यासह सदस्य आणि वकीली क्षेत्रातील सर्व जण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post