प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- पोलिस अधिकारी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हयात कार्यकाळ संपलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.या बदल्यांचा आदेश पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी जारी केला.या आदेशा नुसार नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी लक्ष्मीपुरीचा पदभार स्विकारला असून करवीर पोलिस ठाण्याचा पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी स्विकारला आहे.
अन्य बदल्या खालील प्रमाणे पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे (हुपरी),विलास भोसले (पेठ वडगांव ),शिवाजी गायकवाड (शिरोळ) आणि हातकंणगले येथे अशोक सायकर यांची बदली झाली आहे.जयसिंगपूर पोलिस ठाण्याचा पदभार पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी स्विकारला असून हातकंणगले पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डी यांनी स्विकारला.या सर्वाना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिले आहेत.