मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 अंतर्गत विभाग स्तरावर कोल्हापूर महानगरपालिकेला प्रथम क्रमांक...

 2 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार..

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दिनांक 9 जानेवारी रोजी होणार सादरीकरण...


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर :  मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित करण्यात आलेला आहे. यामध्ये विभाग स्तरावरील 2 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली असून त्याचे सादरीकरण दिनांक 9 जानेवारी रोजी होणार आहे..

  दिनांक 15 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये नगर विकास विभागामार्फत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 घोषित करण्यात आलेली होती. त्यामध्ये राज्यस्तर आणि विभाग स्तर अशी बक्षिसे जाहीर करण्यात आलेले असून कोल्हापूर महानगरपालिकेने यामध्ये भाग घेतलेला होता. याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त यांचे समोर करण्यात आले होते, तसेच पुणे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत समितीने कोल्हापूर शहराची तपासणी मागील महिन्यामध्ये केली होती. या स्पर्धेचे निकाल जाहीर झालेले असून पुणे विभागात ड वर्ग महानगरपालिका मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलेला आहे व दोन कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे.

   विभाग स्तरावर विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली समितीने पुणे विभागातील सर्व ड वर्ग महानगरपालिकांचे सादरीकरण व प्रत्यक्ष तपासणी करून हा निकाल जाहीर केलेला आहे...

  या स्पर्धेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली केशवराव भोसले नाट्यगृह याठिकाणी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते.

  त्या अनुषंगाने सर्व विभागांनी स्पर्धेच्या निकषाच्या अनुषंगाने तयारी केली.

  या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने शहरातील चौक सुशोभिकरण, प्रमुख इमारती, वारसास्थळे, जलाशयांची देखभाल, कचरा संकलन, अतिक्रमण कारवाई, मालमत्ता कर संकलन, वाचनालय व्यवस्था, नाविन्यपूर्ण योजना, सार्वजनिक वाहन स्थळ, पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्रे वारसा स्थळांची जपणूक, सार्वजनिक उद्याने, आरोग्य सुविधा, शाळा परिसर स्वच्छता,ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, क्रीडांगणे सुस्थितीत ठेवणे या निकषाचा समावेश असून त्या अनुषंगाने सर्व विभागांनी तयारी केलेली होती..

  या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्शजित घाडगे,सर्व विभाग प्रमुख यांनी निकषानुसार सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या...

Post a Comment

Previous Post Next Post