कोल्हापुरकरांनी जर मनात आणले तर प्रामाणिकपणे काम करणारयांस डोक्यावर घेतात - पोलिस निरीक्षक ओमासे .


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- राधानगरीचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांची सांगली येथे बदली झाल्यामुळे राजारामपुरी येथील राष्ट्रवादीचे नेते नितीन पाटील यांनी त्यांच्या  सत्काराचे आयोजन केले होते .अध्यक्षस्थानी राजापुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  अनिल तनपुरे होते.ओमासे यांनी दीड वर्ष या पोलिस ठाण्यात सेवा बजावली होती.यावेळी ओमासे यांनी केलेल्या कामाबदल या परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना या हद्दीतील गुन्हेगारावर नियंत्रण ठेवल्याचे सांगत त्याच पध्दतीने तनपुरेसो यांचे काम सुरु असल्याचे सांगितले.नितीन पाटील यांनीही ओमासे यांना शुभेच्छा दिल्या .

या सत्कार सोहळा प्रसंगी ओमासे भारांवून गेले.या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना कोल्हापुरात प्रामाणिकपणे आपले काम चोख केले की या कामाचे चीज होते.येथील नागरिक त्यांना डोक्यावर घेतात.असे मनोगत व्यक्त करुन कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन नितीन पाटील यांनी केले असून या भागातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांच्यासह राजारामपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.शेवटी सुखदेव बुद्द्याळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post